Pune : पुण्यात खळबळ, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, २०० पोलीस एकाचवेळी पोहोचले, १०० जणांना ताब्यात

Pune Cyber Fraud News : पुणे पोलिसांनी खराडी येथील बोगस कॉल सेंटरचा बुरखा टराटर फाडला आहे. मध्यरात्री धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. खराडी येथे अद्यापही कारवाई सुरू आहे. २०० पोलिसांचा फौजफाटा सध्या तिथे उपस्थित आहे. आतापर्यंत १०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्या जप्त करण्यात आले आहे.

पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. या कारवाईत १०० हून अधिक जणांना पकडण्यात आले आहेतय. यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे. पोलिसांनी ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.

Pune News : पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, १५ आरोपींमध्ये डॉक्टर तावरेंचाही समावेश; परिसरात खळबळ

खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील या इमारतीच्या नवव्या मजल्यावर हे बनावट कॉल सेंटर कार्यरत होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांना बनावट डिजिटल अटकेची भीती दाखवली जात होती. त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी गुजरातमधील असून, या कॉल सेंटरमध्ये काम करणारे १०० ते १५० कर्मचारी देखील गुजरातचे आहेत.

पुणे सायबर पोलिसांनी या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले असून, इतर अनेकांची चौकशी सुरू आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटाची तपासणी सुरू आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यामागील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुजरात आणि इतर ठिकाणी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply