Pune : पुणेकरांवर आजपासून पाणीसंकट, कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणीकपात?

Pune Water Crisis Latest News : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. आजपासून पुण्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाणीकपात केली जाणार आहे. पुणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे. आजपासून शहरातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात झाली आहे.

दक्षिण पुण्याला आजपासून रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता भाग, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक या भागाचा यात समावेश आहे. वडगांव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांत उद्यापासून रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे.

पुणेकरांवर आजपासून पाणीकपात लागू होणार आहे. पाणीपुरवठा नियंत्रित करण्यासाठी पुढील आठवडाभर शहरातील वेगवेगळ्या भागांत पाणी बंद ठेवले जाईल. पाण्याची कमतरता आणि वाढती मागणी लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येईल. नागरिकांनी पाणी साठवणुकीची व्यवस्था करावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.

कुठल्या भागात कधी होणार पाणीकपात?

सोमवार: बालाजीनगर, गुरु दत्त सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, साईनगर, श्रीकृष्ण सोसायटी, कात्रज तलाव लगतचा भाग

मंगळवार: सन सिटी, जुनी धायरी, राजस सोसायटी परिसर, खडी मशीन चौक, सिंहगड कॉलेज

बुधवार: वडगाव, आनंद नगर, हिंगणे, आंबा माता मंदिर, वाघजाई नगर, सुख सागर भाग २

गुरुवार: धनकवडी गावठाण, टिळकनगर, स्वामी समर्थ नगर, काकडे वस्ती

शुक्रवार: आंबेगाव पठार सर्व्हे नंबर १५ ते ३०, भारती विद्यापीठ मागील सर्व परिसर, दत्त नगर, वटेश्वर मंदिर, जांभूळवाडी रस्ता

शनिवार: गुजर वाडी फाटा, राजीव गांधी वसाहत, कात्रज गाव, काकडे वस्ती

रविवार: महादेव नगर, विद्यानगर, पारघे नगर, अश्रफ नगर

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply