Pune : दुबईहून पुण्यात आला, विमानतळावरच व्यवसायिकाच्या बॅगमधून चोरी

Pune airport News : दुबईहून पुण्याला स्पाईस जेटच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका पर्यटन व्यवसायिकाच्या सामानातून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना पुणे विमानतळावर उघडकीस आली आहे. २८ एप्रिलला दुबईहून परतताना लॉक असलेली बॅग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्यानंतर, पुणे विमानतळावर पहाटे बॅगचे लॉक तुटलेले आणि रोकड गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपासाला सुरुवात झाली आहे. यापूर्वीही अशा चोरीच्या घटना घडल्या असल्याने विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विमान प्रवासात दीड लाखाची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईहून पुण्याला स्प्राईट जेट कंपनीच्या विमानातून येणाऱ्या एका व्यवसायिकाच्या सामानातून दीड लाखाची रोकड चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.पुणे विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणा नंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी देखील असे सामान चोरीचे प्रकार घडले आहेत. याबाबत फिर्यादी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

फिर्यादी हे पर्यटन व्यवसायिक आहेत.कामाच्या निमित्ताने २८ एप्रिलला दुबई येथे गेले होते.काम संपवून स्पाइट जेट कंपनीच्या विमानाने गुरुवारी मध्यरात्री पुण्यासाठी निघाले त्यावेळी लॉक असलेली बॅग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे दिली.त्यामध्ये दीड लाख रोकड होती.पुणे विमानतळावर पहाटे सव्वाचार वाजता उतरले तेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सामान घेण्यासाठी बॅग घेतली असता तिचे लॉक तुटलेले दिसले.त्यावेळी त्यातील रक्कम गायब होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस तपास या प्रकरणाचा करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply