Pune : स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर

Pune : २५ फेब्रुवारीला स्वारगेट बस डेपोत तरूणीवर २ वेळा अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. २६ वर्षीय पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच पीडित तरूणीला प्रदान केली जाणार असल्याची माहिती आहे.

स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील २६ वर्षीय पीडित तरूणीला राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित तरूणीला तीन लाख रूपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. पीडित तरूणीला मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी ही मदत दिली जाणार असून, त्यासाठी यापूर्वी शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे.

ST Crisis : लाडकींना घर बसल्या पैसे, मग एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनाला कात्री का? अर्धा पगार मिळाल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक

याच शिफारशीनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आर्थिक मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पीडित महिलांना मानसिक आधार देण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी मनोधैर्य योजना राबवली जाते. याच योजनेखाली पीडितेला राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम पीडित तरूणीला प्रदान केली जाणार आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत २५ फेब्रुवारीला एका २६ वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी दत्ता गाडे याचा ताबा मिळवण्याचा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply