Congress: "मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर.." गर्भवती महिला मृत्यूप्रकरणावर विजय वडेट्टीवार कडाडले

Pune : पुण्यात सध्या गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. भिसेचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. तसेच मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली आहे.

"मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय योगदान दिलं? कला क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं, पण समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून नाही आलेली", असे विजय वडेट्टीवार म्हणालेत. तसेच "अशा प्रकरणांवर सरकारने लक्ष देऊन, गरिबांचे शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई केली पाहिजे", असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

Fraud Case : मुलीला तहसीलदार बनविण्याचे आमिष; महिलेची साडेदहा लाख रूपात फसवणूक

मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली

"मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी आहे. दान केल्याचं कधी कुणी पाहिलं का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो उदो केला. समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आलेली नाही".

"ज्या खिलारे पाटलांना दवाखान्यासाठी जमीन दिली त्यांना सोडलं नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे. गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply