Pune News: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर; गर्भवती महिला ५: ३० तास रूग्णालयातच तरीही..

Pune : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सध्या गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी चर्चेत आहे. रूग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. दीनानाथ रूग्णालयाने उपचारासाठी १० लाख रूपये अनामत रक्कम मागितली होती. मात्र, ती रक्कम न दिल्यामुळे तनिषा दगावल्या असा आरोप होत आहे. अशातच मृत्यूप्रकरणी राज्य शासनाच्या आदेशानुसार गठित केलेल्या चौकशी समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.

चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल

र्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गठित केलेल्या चौकशी समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. रूग्णालय प्रशासनाच्या निवेदनानुसार, तनिषा भिसे या रूग्णालयात सुमारे ५ तास ३० मिनिटे रूग्णालयात उपस्थित होत्या. तसेच कोण्त्याही वैद्यकीय कर्मचाऱ्याला कल्पना न देता परस्पर रूग्णालयातून निघून गेल्या, असे नमूद करण्यात आले आहे.

परंतु, चौकशी समितीच्या निरीक्षणानुसार, महाराष्ट्र शासनाच्या शुश्रूषागृह नोंदणी नियम २०२१ मधील नियम ११(जे) आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत शुश्रूषागृहाची पुढीलप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.

१. गंभीर रुग्णाला प्राथमिकता देऊन जीवनरक्षक सेवा पुरविणे.

२. रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीकडे न पाहता तातडीची मदत करणे.

३. रुग्णाच्या आजारासंदर्भातील वैद्यकीय टिपणीसह, शक्य तितक्या लवकर, नजीकच्या आणि सोयीच्या संदर्भ रुग्णालयात रुग्णाला पाठवणे.

४. "गोल्डन हावर्स" उपचार पद्धतीचे पालन करणे.

वरील तरतुदीनुसार, रूग्णालयाने रूग्णाला तातडीने प्राथमिक उपचार करणे, तसेच योग्य रितीने जबाबदारी पार पाडायला हवी होती. मात्र, अशी कोणतीही कारवाई केल्याचे पुरावे अहवालातून आढळून आलेले नाहीत.

रूग्णालयाच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल यंत्रणा, धर्मादाय कक्ष आणि जनसंपर्क अधिकारी यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना संभाव्य उपचार खर्च, धर्मादाय योजना आणि मदतीचा पर्यायांची माहिती देणे अपेक्षित होते. यासंबंधीत कोणतीही माहिती, समुपदेशवन अथवा लेखी नोंद उपलब्ध नसल्याचे अहवालात नमूद आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply