Pune : काॅफीतून गुंगीचे ओैषध देऊन मैत्रिणीचे दागिने चोरी, भारती विद्यापीठ पोलिसांकडून तरुणी अटकेत

Pune : मैत्रिणीला काॅफीतून गुंगीचे औषध देऊन कपाटातील दागिने चोरुन पसार झालेल्या तरुणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तरुणीकडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपीच्या तरुणीच्या मैत्रिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी मैत्रिणी आहेत. ६ मार्च रोजी तरुणी मैत्रिणीच्या घरी आली होती. त्या वेळी तिने मैत्रिणीला काॅफी करुन दिली. तिच्या नकळत काॅफीत गुंगीचे ओैषध मिसळले. मैत्रीण बेशुद्ध पडल्याने तिने कपाटातील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन ती पसार झाली. मैत्रिणीला शुद्ध आल्यानंतर तरुणी पसार झाल्याचे लक्षात आले. तेव्हा शयनगृहातील कपाट उघडून दागिने चोरल्याचे उघडकीस आले.

Pune : पोस्ट डॉक शिष्यवृत्तीसाठी, १४ उमेदवारांची निवड, सहा वर्षांच्या खंडानंतर नव्याने योजना

त्यानंतर तिने आरोपी तरुणीला जाब विचारला. तेव्हा दागािने चोरल्याची कबुली देऊन तिने दागिने परत करते, असे तिला सांगितले. त्यानंतर तिने दागिने परत केले. तिच्याकडे दागिने परत करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अखेर मैत्रिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या मैत्रिणीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर,

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक विश्वास भाबड, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका मोकाशी यांनी ही कामगिरी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply