Pune : पोस्ट डॉक शिष्यवृत्तीसाठी, १४ उमेदवारांची निवड, सहा वर्षांच्या खंडानंतर नव्याने योजना

Pune : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली ‘एसपीपीयू पोस्ट डॉक’ शिष्यवृत्तीची प्रक्रिया पूर्ण करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १४ शिष्यवृत्तीपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या निवडीनंतर सहा वर्षांनी नव्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर राज्यातील उमेदवार पुढील संशोधनासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. ही बाब लक्षात घेऊन पीएच.डी.नंतरच्या संशोधनाला चालना देण्यासाठी डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या कुलगुरू पदाच्या काळात पुढाकार घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पोस्ट डॉक फेलोशिप सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहुधा राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. २०१९ मध्ये राबवलेल्या पहिल्या प्रक्रियेनंतर करोना प्रादुर्भाव आणि अन्य तांत्रिक कारणांनी या शिष्यवृत्तीमध्ये खंड पडला होता.

Waqf amendment bill : नवा कायदा लागू, राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी

मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या यंदा सप्टेंबरमध्ये पुन्हा पोस्ट डॉक शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र, पुढील प्रक्रिया रखडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केले होते. त्यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने निवड प्रक्रियेला गती देऊन छाननी, मुलाखती आदी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी, पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. एम. व्ही. रासवे यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध केली. त्यानुसार एकूण १४ विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा ४३ हजार ८०० रुपये शिष्यवृत्तीच्या रूपाने मिळणार असून, त्यांना तीन वर्षे पूर्ण वेळ संशोधन करावे लागणार आहे.

सर्वाधिक विद्यार्थी विज्ञानाचे…

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत. त्यात भौतिकशास्त्राचे चार, जीवशास्त्राचे तीन, रसायनशास्त्राचे दोन विद्यार्थी आहेत. तर मराठीचे तीन, अर्थशास्त्र आणि हिंदीच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply