Pune : महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद, शहरातील २५ तलाव सुरू

Pune : पुणे महापालिकेचे ३५ पैकी १० जलतरण तलाव विविध कारणांनी बंद असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने केलेल्या पाहणीमध्ये ही बाब स्पष्ट झाली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या जलतरण तलावांची दुरुस्ती तातडीने करून ते कार्यान्वित करण्याच्या सूचना क्रीडा विभागाने दिल्या आहेत.

शहरातील विविध भागांत नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने ३५ जलतरण तलाव उभारले आहेत. या तलावांमध्ये पोहण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी असल्याने उन्हाळ्यात महापालिकेच्या जलतरण तलावांवर मोठी गर्दी होते. सध्या महापालिकेचे २५ तलाव सुरू असून, १० तलाव विविध कारणांनी बंद असल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्यात हे तलाव बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होऊन महापालिकेच्या उत्पन्नाला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बंद तलावांच्या तांत्रिक अडचणी, तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांना खुले करण्याच्या सूचना क्रीडा विभागाने दिल्या आहेत.

क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी शहरातील महापालिकेचे दहा जलतरण तलाव बंद असल्याचे स्पष्ट केले. काही तलावांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. काही तलावांचे ठेकेदारांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर काही तलावांचे करारनामे पूर्ण न झाल्याने हे तलाव सध्या बंद आहेत.

Pimpri : अपहृत मुलाची दोन तासांत सुटका; कशासाठी केले अपहरण?

हे तलाव आहेत बंदशिवाजीनगर भागातील आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव, येरवडा येथील केशवराव ढेरे जलतरण तलाव, पाषाण येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव, औंध गाव येथील औंध जलतरण तलाव, हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हे दुरुस्तीच्या कामामुऴे बंद आहेत. तर, शनिवार पेठेत असलेल्या न. वि. गाडगीळ जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तो अद्याप सुरू झालेला नाही.घोरपडी येथील नारायण तुकाराम कवडे पाटील जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र त्याचा करारनामा न झाल्याने तो बंद आहे. सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झालेली नाही. बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया पार पडलेली नाही. शिवदर्शन येथील जलतरण तलाव व क्रीडा संकुलाच्या संदर्भात न्यायालयीन वाद आणि दुरुस्तीमुळे तो बंद असल्याचे समोर आले आहे.

शहरातील दहा जलतरण तलाव विविध कारणांनी बंद आहेत. त्यांपैकी पाच तलाव किरकोळ कामे आणि करारनामे प्रलंबित असल्याने सुरू झालेले नाहीत. या महिन्याच्या अखेरपर्यंत ते सुरू केले जातील. उर्वरित पाच तलाव तांत्रिक कारणांमुळे सुरू करण्यास अडचणी आहेत. – किशोरी शिंदे, उपायुक्त, क्रीडा विभाग, पुणे महापालिका



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply