Pune : विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या! अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य, तक्रारीकडे दुर्लक्ष…

Pune : रात्री जेवायला जात असलेल्या तीन मुलींकडे पाहून एका अज्ञात व्यक्तीने अश्लील कृत्य केल्याची घटना मंगळवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडली. या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करून गुरुवारी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अश्लील प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनींनी लगेच त्याबाबत सुरक्षारक्षकांना कल्पना दिली. मात्र, सुरक्षारक्षकाने त्वरित प्रतिसाद न देता ‘अशा मार्गावरूनच का जाता’ असा प्रश्न विचारला. त्यामुळे आरोपी पळून जाऊ शकला, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आणि संबंधित सुरक्षारक्षकांवर कारवाईची मागणी केली. वसतिगृह प्रशासनानेही या घटनेची दखल घेतली नाही. संबंधित विभागप्रमुखांना सांगितल्यावर त्यांनीही ‘अभ्यासाने अशा विकृतीला उत्तर द्या’ असे नमूद केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Thane : ठाण्यातील कलेक्टरच्या पीए पल्लवी सरोदे यांचा मृत्यू

विद्यापीठ विद्यार्थिनींच्या पाठीशी

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात २५ मार्च रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका विकृत व्यक्तीने काही विद्यार्थिनींसमोर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विद्यापीठास प्राप्त झाली आहे. विद्यापीठ प्रशासन या बाबत अतिशय संवेदनशील असून, विद्यार्थिनींच्या पाठीशी आहे. सदर घटनेतील विकृत व्यक्तीविरुद्ध विद्यापीठाने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तसेच, या बाबत कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या, चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्धही विद्यापीठ प्रशासन कायद्याप्रमाणे कडक कारवाई करीत आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत याबाबत विद्यापीठ सर्व ती खबरदारी घेत आहे,’ असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply