
Pune : अजित पवार यांच्या महायुतीमधील समावेशामुळे आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ‘संभ्रमा’त असलेल्या कार्यकर्त्यांना मार्ग दाखविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रविवारी केला. येथे झालेल्या अधिवेशनात शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले. ‘शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत,’ ‘पराभूत होऊनही राहुल गांधी अहंकाराने फुगले आहेत,’ ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी असून औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत,’ अशा कडवट शब्दांत विरोधकांवर टीका करून भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
प्रदेश भाजपचे अधिवेशन रविवारी पुण्यात पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राज्यातील मंत्री, नेते उपस्थित होते. शहा, फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांवर कडाडून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकातील लेखात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील युतीमुळे भाजप कार्यकर्ता ‘संभ्रमा’त असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्यावर टीका करतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही जोरकसपणे मांडून कार्यकर्त्यांना एक प्रकारे या मुद्द्यांवर निवडणुका लढण्याचा संदेश दिला गेला.
|
Pune : महापालिकेत दहा कोटींचा ठेका मिळवण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले |
‘हिंदुत्वाचा मुद्दा आणि विचारधारा भाजपने कधीही सोडलेली नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तह किंवा सलगी करावी लागते,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न झाला. ‘महाविकास आघाडी म्हणजे हवा भरलेला फुगा असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत फुग्याला टाचणी लागली आहे. विधानसभा निवडणुकीत हा फुगा फुटेल,’ अशा शब्दांत भाजप नेत्यांनी विरोधकांना धारेवर धरले.
विजयी होऊनही कार्यकर्ते निराश आहेत. त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, याची कबुली देतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीतील विरोधकांच्या खोट्या राजकीय कथानकाला त्याच भाषेत उत्तर द्या, आदेशाची वाट पाहू नका, असा कानमंत्र फडणवीस आणि शहा यांनी दिला. ‘लोकसभा निवडणुकीतील खोट्या राजकीय कथानकातून शिकलो आहे, विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करून विधानसभा निवडणुकीची रणनीतीही स्पष्ट करण्यात आली. ‘आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला. तर, ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आणि खुनी आहेत,’ असा हल्लाबोल बावनकुळे आणि मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीची चर्चा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने त्याची चर्चा रंगली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ असून, त्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरे आहेत.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
समाजात दुफळी वाढविण्याचे काम काही नेते करत आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही, असे कोणी म्हटले होते?
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

