Pune Fraud Case : बनावट कंपन्या स्थापन करून बनवाबनवी; १५० गुंतवणूकदारांची अडीच कोटींत फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल

Pune : पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात बनावट कंपन्या स्थापन करून यात गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित अशा बनावट कंपन्या स्थापन करून दोन कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात घडलेल्या सदर फसवणुकीच्या प्रकरणात ज्ञानेश खंडू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी वानवडीतील जगताप चौक येथे कार्यालय सुरू केले होते. हिंगे याने स्वतःला 'बायोफिक्स प्रो' या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून घन कचरा व्यवस्थापनासाठी जेसीबी यंत्रांची गरज असल्याचे भासवले. कंपनी दरमहा एक लाख ३० हजार रुपये भाडे आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरणार असल्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते.

Maharashtra Politics : ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली

असा उघड झाला प्रकार

दरम्यान फिर्यादी शिंदे यांनी ३९ लाख रुपयांचे जेसीबी यंत्र खरेदी करून कंपनीला दिले. मात्र, त्यांना पहिल्या महिन्यात केवळ ६० हजार रुपये मिळाले. यामुळे संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता हे यंत्र कात्रज- कोंढवा रस्त्यावर उंड्रीतील एका गोदामात सापडले. चौकशीत हे यंत्र दर्पण ठक्कर याच्या मध्यस्थीने परस्पर विक्री करण्यात आले असल्याचे उघड झाले. याबाबत शंभरहून अधिक गुंतवणूकदारांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दीडशेहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक फसवणुकीच्या चौकशीत बायोफिक्स प्रा. लि, म्युफ्याको कंपनी भारत इंडस्ट्रीज अशा विविध कंपन्यांमध्ये वाहने भाडेतत्त्वावर लावण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवून फसवणूक केली आहे. यात मोटार, टेम्पो, जेसीबी, ऑर्गनिक वेस्ट कंपोस्ट यंत्र अशी वाहने खरेदी करण्यास प्रवृत्त करून साधारण १५० हुन अधिक जणांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात प्रणय उदय खरे, संकेत सुधीर थोरात, सोनू नवनाथ हिंगे, रिझवान फारुख मेमन, वृषाली संतोष रायसोनी, विजय चंद्रकांत आशर आणि दर्पण ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply