Pune : शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील पुनर्वापराकरिता साठवण्यासाठी लागणाऱ्या कचऱ्याच्या पिंजऱ्याला कलात्मक रूप देण्यात आले आहे. सुटसुटीत आणि सहज हाताळता येण्यासारख्या पिंजऱ्याचे नवे प्रारूप डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) २० विद्यार्थिनींनी तयार केले आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून हे प्रारूप पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता प्रभागातील आनंदनगर भागात बसवण्यात आले असून, स्थानिक नागरिक आणि कचरावेचकांकडून त्याचा वापर करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनातील कागद, काच आणि प्लॅस्टिक वेगळे करून पिंजऱ्यात वर्गवारीनुसार ठेवले जाते. या पिंजऱ्याच्या नव्या प्रारूपाची रचना विद्यार्थिनींनी केली. प्रा. महेश बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली तृप्ती थापा, मोहिनी मांडके यांच्यासह एकूण २० विद्यार्थिनींनी कचरावेचकांच्या गरजा विचारात घेऊन नवा पिंजरा तयार केला. ‘स्वच्छ’ या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंधार जोशी यांनीही त्यासाठी सहकार्य केले. या पिंजऱ्याचे प्रारूप नॅशनल असोसिएनश ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चरतर्फे (नासा) आयोजित केलेल्या ६७ व्या वार्षिक नासा डिझाईन स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते.
|
जोशी म्हणाले की, शहरातील घनकचरा पुनर्वापरासाठी वापरले जाणारे लोखंडी पिंजरे लवकर गंजतात. त्यात उंदीर, घुशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. कचराकुंडी समजून स्थानिक नागरिक त्याच्याजवळ कचरा टाकतात. पिंजऱ्याच्या नव्या डिझाईनमुळे आता या कचऱ्याचे अधिक व्यवस्थित आणि कार्यक्षम पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बीएनसीएने तयार केलेल्या या पिंजऱ्यासारखे आणखी पिंजरे शहर आणि उपनगरांमध्ये बसवण्यात येतील.
पिंजऱ्याभोवती स्वच्छता आणि कचऱ्याचा पुनर्वापराचे पर्यावरणपूरक संदेशही कलात्मक पद्धतीने लावण्यात आले आहेत. ‘स्वच्छ पुणे’ या संकल्पनेसाठी सामाजिक आणि स्वच्छ पर्यावरणाच्या बांधिलकीतून हा प्रकल्प केल्याचे प्रा. बांगड यांनी सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘स्वच्छ’ संस्थेशी चर्चा करताना कचरावेचकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात आल्या. त्यानुसार पूर्वी वापरात असणाऱ्या लोखंडी पत्र्याऐवजी सिमेंटचे पत्रे वापरून १० फूट लांब, पाच फूट रूंद, नऊ फूट उंचीचा पिंजरा तयार केला. तो सुटा करून कुठेही नेता येतो. एरवी कचऱ्याचे पिंजरे आपल्या वसाहतींपाशी नको अशी नागरिकांची धारणा असते. मात्र, हा पिंजरा छोट्या टुमदार कार्यालयासारखा दिसतो. त्यामुळे या नवीन कलात्मक पिंजऱ्यांनी ही धारणा बदलून टाकली आहे, असे मोहिनी मांडके या विद्यार्थिनीने सांगितले.
शहर
- Solapur : पोलिसाच्या अंगावर थुंकला; पोलीस निरीक्षकावरही हल्ला, सोलापुरातील धक्कादायक प्रकार
- Pimpri : मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त ‘ऑन ग्राऊंड’, १४ मालमत्ता सील
- Pune : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना, मनुष्यबळामध्ये दोनशे कर्मचाऱ्यांची भर
- Pimpri : आता बांधकाम पूर्णत्वानंतर मिळकतकर नोंदणी लगेच
महाराष्ट्र
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं
- Crime News : ‘त्याने माझ्या नोकरीशी लग्न केलं, माझ्याशी नाही…’, भावाला भावनिक मेसेज पाठवून शिक्षिकेने संपवलं जीवन; पती, सासऱ्याला अटक
- Sunita Williams Return Updates : सुनीता विल्यम्स यांच्या ‘ग्रह’वापसीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धैर्याची, धाडसाची अन्…”
- Donald Trump : “दिलेलं वचन पूर्ण केलं”, सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया; एलॉन मस्क यांना म्हणाले…