Pune Metro News : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो ३ प्रकल्पाचा अडथळा दूर

Pune : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागा उपलब्ध झाल्या असून, आता या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांना १०० टक्के जागा हस्तांतरित केल्या आहेत.

हा मेट्रो प्रकल्प २३.२०३ किलोमीटर लांबीचा असून, त्याची अंमलबजावणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पास ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

शेवटच्या टप्प्यातील जागा मिळाली

Mumbai Bike Taxi : मुंबईकरांचा प्रवास सुसाट, लवकरच बाईक टॅक्सी धावणार; वेळ-खर्च वाचणार

प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळील २६३.७८ चौ.मी. जागा जीन्यासाठी आवश्यक होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जागेच्या हस्तांतरणास मंजुरी दिल्याने आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा उपलब्ध झाली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वाला गती

या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्पाला वेग मिळणार आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन पुणेकरांसाठी एक नवीन प्रवास सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply