Pune : जुन्या गाद्या, उशा, खराब झालेले कपडे, तसेच विविध प्रकारचे फर्निचर अशा कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिकेला अडचणींना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने अशा वस्तूंवर प्रक्रिया करणारा स्वतंत्र प्रकल्प उभारला जाणार आहे.
या नवीन प्रकल्पातून चटया, बसकण, पायपुसणी आदी गृहोपयोगी वस्तू तयार केल्या जाणार आहेत. तसेच यामुळे जुने फर्निचर, कपडे, फायबर च्या वस्तू, काचा, घरातील जुन्या गाद्या उशा यांची विल्हेवाट लागण्यास मदत होणार आहे.
पुणे शहरात दररोज २२०० ते २३०० टन कचरा गोळा केला जातो. यामध्ये सुका कचरा ११०० ते १२०० टन, तर उरलेला ओला कचरा असतो. कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्यासाठी महापालिका दर वर्षी शेकडो कोटी रुपये खर्च करते. दररोज गोळा होणाऱ्या सुक्या कचऱ्यामध्ये जुने फर्निचर, टाकाऊ वस्तू, गाद्या, उशा, चादरी यांचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के म्हणजे सुमारे ७५ ते १०० टन इतके आहे.
हा कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावताना महापालिकेला अनेक अडचणी येतात. या कचऱ्यामुळे यंत्रणेवर ताण येऊन ती कोलमडून पडण्याचे प्रकार घडतात. शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये अनेकदा असे घडले आहे. त्यामुळे हा कचरा घेण्यास प्रकल्प चालविणाऱ्यांकडून विरोध केला जातो. परिणामी, हा कचरा घेण्यास कचरावेचकही टाळाटाळ करतात.
वापरात नसलेले फर्निचर, जुने कपडे रस्त्यांवर पडून राहतात. काही ओसाड भागांत, मोकळ्या मैदानांवर हा कचरा टाकल्याचे सर्रास आढळते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी दररोज असा सुमारे १०० टन कचरा पडलेला असतो. अस्तित्वातील प्रक्रिया प्रकल्पांत यावर प्रक्रिया होत नसल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे
Pune : अधिवेशनापर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर… एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन |
शहराच्या पश्चिम भागातील जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प ७५ टन क्षमतेचा आहे. तो तातडीने कार्यान्वित व्हावा, यासाठी महापालिकेच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात याचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ती तरतूददेखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पात प्रक्रिया झालेल्या कचऱ्यातून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यात येणार आहेत.
घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, घरातील जुने फर्निचर, गाद्या, उशा, तसेच जुने कपडे यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. त्यामुळे शहरातील मोकळ्या आणि ओसाड जागांवर वर्षानुवर्षे हा कचरा पडून राहतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
शहरात दररोज तयार होणारा कचरा : २३०० टन
सुका कचरा : ११०० ते १२०० टन
ओला कचरा : १००० ते ११०० टन
फर्निचर, जुने कपडे, गाद्या यांचा कचरा : ७५ ते १०० टन
शहर
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Pune : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला पकडले- भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
- Pune : लष्कराचा इतिहास, शौर्याचे जवानांच्या पत्नींकडून कथन; युद्ध स्मारक, संग्रहालय येथे टूर गाईड म्हणून नियुक्ती
- Mumbai : कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन धारावीसाठी बेकायदेशीरित्या हस्तांतरित, अदानीच्या फायद्यासाठी अनेक नियमांचे उल्लंघन
महाराष्ट्र
- Maharashtra Budget 2025 : मुंबईत तिसरं विमानतळ, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनला जोडणार; अजित पवारांची मोठी घोषणा
- Rohini Khadse : “महिलांना एक खून माफ करा”, महिला दिनी रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या…
- Sangli : सांगली बाजारात हळदीला ३० हजार रुपये सर्वोच्च दर
- Sangli : एसटीमध्ये विनयभंग; सांगलीत एकास अटक
गुन्हा
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
- Pune Crime : गुंडगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचा दणका; मारहाण केल्यानं गेली नोकरी
- Mumbai : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ
- Pune Crime : क्लासमेटचा त्रास, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीने १५ व्या मजल्यावरून उडी मारली, पिंपरी हादरले
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Cape Canaveral : खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ची मोहीम
- IIT Baba News : भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..
- Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
- New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत