Pune : शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन टायगर रखडलं, कारण माजी आमदाराने आधीच ठेवली मोठी अट

Pune : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक नेत्याने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याच दरम्यान, महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस आणि शिंदे गटात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाकडून मिशन टायगर राबवण्यात येत आहे. मात्र, पुण्यात मिशन टायगरला थंड प्रतिसाद मिळत आहे.

अशातच पक्षात प्रवेश करण्यासाठी आणि भाजपसोबत छुपी लढाई करण्यासाठी एका माजी आमदाराने नगरसेवक आणि शहराध्यक्ष पदाची मागणी केली आहे.

राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर, शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि विरोधकांना आणखी एक धक्का देण्याची रणनिती आखत आहेत. माजी आमदार रविंद्र धंगेकर आणि महेश बाबर हे दोन्ही नेते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांनी उघडपणे याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे पुण्यात नेमके कोणते नेते धनु्ष्यबाण हाती घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Metro: मूहूर्त ठरला! बीकेसी ते वरळी मेट्रो या दिवशी धावणार, ट्रायल सुरु

मात्र, पुण्यात पक्षप्रवेश करण्यासाठी एका माजी आमदाराने एक अट ठेवली आहे. १५ ते २० नगरसेवक आणि शहराध्यक्ष पद द्या.शिवाय म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद यापैकी एकावर संधी द्या, अशी मागणी माजी आमदारांनी केली असल्याची माहिती शिंदे सेनेतील एका वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

भाजपसोबत छुपी लढाई

'शहरात पक्ष वाढवायचा असेल तर भाजपसोबत छुपी लढाई करावी लागेल आणि ती मीच करू शकतो', असा दावा माजी आमदारांनी केला आहे. मुंबईत काही नेत्यांसोबत ३-४ बैठका देखील झाले असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, माजी आमदाराच्या अटी मान्य करताना शहर पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply