Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण

Pune Crime News : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची दादागिरीची घटना समोर आली आहे. कोथरूडमध्ये गजा मारणेच्या टोळीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचे काम करणाऱ्या तरूणाला बेदम मारहाण केली. कोथरूडमध्ये तरूणाला रस्त्यात गाठत लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. देवेंद्र पुरुषोत्तम जोग असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ काँलवर देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांची विचारपूस केली आहे. देवेंद्रला मारहाण करणारे सर्व आरोपी नुकतेच जामीनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.

कोथरूडमधील मारणे टोळीतील काही गुंडांनी पुण्यात कोथरूडमध्ये तरूणाला कोणतेही कारण नसताना भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे टोळक्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौक येथे घडली.

Dadar News : मुंबईत 'उडता पंजाब'! दादरमधून ५ किलोचा ड्रग्ज जप्त, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोथरूडमधील मयूर कॉलनी येथे राहायला आहे. तो एका आयटी कंपनीत नोकरी करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने बुधवारी कंपनीला सुटी होती. त्यामुळे तक्रारदार घरीच होता. दुपारी चारच्या सुमारास तक्रारदार वैयक्तिक कामानिमित्त दुचाकीवरून भेलकेनगर परिसरात गेला होता. तेथील काम करून तरूण पुन्हा घराकडे चालला असताना, भेलकेनगर चौकातून ‘मारणे टोळी’तील काही व्यक्तींनी काढलेली मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत मारणे टोळीचा प्रमुखही उपस्थित होता.

तरूण मिरवणुकीच्या समोरून दुचाकी घेऊन पुढे गेला. त्याचा राग आल्याने तीन ते चार जणांनी पळत जावून तक्रारदाराला थांबवले आणि शिवीगाळ केली. ‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला’ असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण केली. एकाने तरुणाच्या नाकावर जोराने ठोसा मारला. त्यानंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. मारहाण करून टोळक्याने तेथून पळ काढला. तक्रारदाराने स्वत:ला सावरत वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि ते दोघे कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.

पोलिसांना घ्यावी लागेल कठोर भूमिका

कोथरूड परिसरात मोहोळ, मारणे, घायवळ अशा टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्यांमध्ये वर्चस्व वादातून चढाओढ सुरू असते. त्यातून काही घटना घडत असतात. मात्र, आता या टोळ्यांच्या दहशतीचा सामान्य नागरिक फटका बसत आहे. शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply