Pune : पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात

 

Pune Crime News : जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने रॅली काढली होती. आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात काढत चांगलाच धडा शिकवलाय. पुणे पोलिसांचा धिंड पॅटर्न राज्यात चर्चेत आहे. पुणे पोलिसांकडून आता आरोपींची परेड आणि धिंड रोडवरच काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला जातो, अथवा ज्या ठिकाणी आरोपी मस्ती करतात, तिथेच पोलिसांकडून धिंड काढली जातेय. जानेवारी महिन्यात एका आरोपीने जेल मधून बाहेर आल्यानंतर साथीदारांसह येरवडा परिसरात रॅली काढली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची धिंड काढली. गुड्ड्या कसबे असे या प्रमुख आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा जानेवारी महिन्यात जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० मित्रांनी येरवडा बाजार परिसरात दुचाकीवरून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. यावेळी आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था वर सुद्धा अनेकांनी टीका केली होती .

Pune Metro : केंद्रीय मंत्र्यांनी सूचवले पुणे मेट्रोचे नवे मार्ग, वाहतूक कोंडी फूटणार, कोण कोणत्या भागात जाळं होणार?

यानंतर पोलिसांनी यातील अनेकांना पकडून त्यांना त्याच भागात त्यांची वरात काढून त्यांचा समाचार घेतला होता. आज पुन्हा एकदा पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, प्रथमेश संजय राठोड, बाबा भानुदास गवळी याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपींचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply