Pune : बायको-पोरावर चाकूने सपासप वार, मुलाचा खून करणाऱ्या जन्मदात्या बापाला जन्मठेप

Pune Crime News : चारित्र्याच्या संशय घेऊन बायकोला जबर मारहाण केली. बायको आणि पोरावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले होते. मागील सहा वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्या प्रकरण मार्गी लागलेय. मुलाचा बळी घेणाऱ्या जन्मदात्या बापाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सहा वर्षीय मुलाचा खून केल्याप्रकरणी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चारित्र्याचा संशय घेतल्याने माहेरी निघून गेलेल्या पत्नी आणि मुलावर पतीने चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने मुलाच्या खून प्रकरणात वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

योगेश परसराम बसेरे (रा. पठारे वस्ती, कदम वाक वस्ती, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.तो मूळचा अकोल्यातील रहिवासी आहे. ही घटना पठारे वस्ती येथे १३ जून २०१९ रोजी रात्री अकरा वाजता घडली होती. योगेश बसेरे हा त्याची पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.त्यांच्यात भांडण झाल्याने गौरी तिच्या दोन मुलांसह भावाच्या घरी गेली होती. योगेश पत्नीला भेटण्यासाठी रात्री त्यांच्या घरी गेला. त्यावेळी झालेल्या भांडणात योगेशने पत्नी गौरी आणि मुलगा आयुषच्या गळ्यावर चाकूने वार केले.

Pune Crime : पुण्यात सायबर फसवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली दोघांची ४१ लाखांची फसवणूक

फिर्यादी त्या दोघांना वाचविण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावरही चाकूने वार केला. त्यानंतर योगेशने स्वत:च्या हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत मुलगा आयुषचा मृत्यू झाला. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कामकाज पाहिले.सबळ साक्षीपुराव्याअंती जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी योगेश बसेरे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंड तसेच, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply