Pune : MPSC पेपर विक्री प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन उघड, पोलिसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या

Pune : एमपीएससी पेपर विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. एका व्यक्तीला महाराष्ट्रातून तर दुसऱ्या व्यक्तीला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली. या आधी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक झाली आहे. या सर्वांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. प्रश्नपत्रिका देण्यासाठी त्यांनी तब्बल ४० लाखांची मागणी केली होती. या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्य्ये खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित एमपीएससी पेपर विक्री प्रकरणात आणखी २ जणांना अटक करण्यात आली आहे. एकाला भंडारा जिल्ह्यातून तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. एमपीएससीचे पेपर ४० लाख रुपयांना देतो असे कॉल काही विद्यार्थ्यांना येत होते. या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट (ब) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला घेण्यात आली. या परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष आरोरींनी विद्यार्थ्यांना दाखवले होते.

योगेश सुरेंद्र वाघमारेला (२७ वर्षे) भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. तर दीपक यशवंत साकरेला (२७ वर्षे) मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आधी ३ जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणात आतापर्यंत ५ जण अटकेत आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे

Sangli News: दोरी समजून उचलायला गेला अन् निघाला साप, थोडक्यात तरुण बचावला; सांगितला थरारक अनुभव

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आलेल्या फोन कॉलमध्ये 'नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल.', असे सांगण्यात आले होते. महिलेच्या आवाजातली हा कॉल होता. या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply