Pune News : पैसे मिळाले नाहीत, चोरांनी लॉलीपॉपवर मारला ताव, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune  : पुणे शहर आणि त्याच्या परिसरात घर फोडी आणि दुकान होळीचे प्रमाण वाढले आहे, आणि त्यात आता एक अजब चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी पुण्याच्या भुगाव परिसरातील एक बिर्याणी हाऊसच्या दुकानात चोरी केली. यातील एक विचित्र चोरी म्हणजे बिर्याणी हाऊस मधील लॉलीपॉप चोरी केली गेली.

निखाराशाही बिर्याणी या दुकानात लॉलीपॉप चोरी करून रस्सा टेस्ट केला . त्याचबरोबर दुकानात असणारी तीस रुपयाची चिल्लर ही चोरली व कोल्ड्रिंक्स चोरीत पळ काढला. अमोल सणस जो दुकानाचा मालक आहे त्याने या चोरीबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेच्या तपासासाठी पोलीस कर्मचारी सक्रिय आहेत.

Mumbai Crime: मुंबई हादरली! घरात घुसून दार लावलं, चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार

विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोर दुकानात प्रवेश करताना आणि चोरी करताना दिसत आहेत. चोरांनी कशा पद्धतीने दुकानात प्रवेश केला आणि चोरी केली याचे साक्षीदार सीसीटीव्ही फुटेज आहेत. पैसे मिळाले नाही म्हणून चोरांनी दुकानातून लॉलीपॉपच चोरले. या विचित्र चोरीच्या घटनेविषयी स्थानिकांची प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकाराच्या चोरीत चोर कोणतीही गोष्ट चोरी करत असताना, त्यांचे लक्ष लॉलीपॉप आणि चिल्लरवरही गेले, ज्यामुळे या चोरीला एक वेगळा वळण मिळाले आहे. पुण्यात चोरट्यांच्या अशा चोरींमुळे पोलिसांना जास्त सतर्क राहावे लागेल. पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहे आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply