Pune : ईएसआईसी उप-क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 

Pune : दिनांक ३ जानेवारी रोजी ईएसआयसी उप-क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे ईएसआयसी एससी/एसटी कर्मचारी व अधिकारी संघ आणि रिक्रिएशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संयुक्त संचालक प्रभारी श्री. सुकांता चंद्र दास यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

या प्रसंगी विचारमंचावर उपस्थित ऑफिसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी व सहायक संचालक श्री. नितीन गोताफोडे, उपसंचालक श्री. राजेश सिंग आणि श्री. संजय कुमार शर्मा, एससी/एसटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव दूधमल यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले. रिक्रिएशन क्लबचे सेक्रेटरी श्री. सागर देशमुख, सुश्री वीरश्री पेटे आणि श्रीमती चेष्टा गांधी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी व समाजावर त्यांच्या योगदानाबद्दल विचार व्यक्त केले.

Santosh Deshmukh Case : फरार घुलेला आर्थिक रसद पुरवल्याचा संशय, SIT कडून वकील, डॉक्टरांची कसून चौकशी


कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुकांता चंद्र दास यांनी आपल्या प्रेरणादायक भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाला राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक परिवर्तनासाठी ऐतिहासिक म्हटले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे काम केले, जे आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याचं आवाहन केलं.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. निखिल उगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विशाल वाणी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देणारा हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी संदेश ठरला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply