Pune : पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला पकडले, पिस्तुलासह काडतूस जप्त

Pune  : पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला आंबेगाव (भारती विद्यापीठ) पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आर्यन बापू बेलदरे (वय १९, रा. आई श्री व्हिला अपार्टमेंट, आंबेगाव बुदुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंबेगाव परिसरातील दत्तनगर परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी आई श्री अपार्टमेंटजवळ असलेल्या गोठ्यात बेलदरे थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. चैाकशीत त्याने एका महाविद्यालयीन तरुणाकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती दिली. हे पिस्तूल तो जादा दराने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची कबुली पोलिसांना दिली.

Pune : पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वसूल केला इतक्या हजारांचा दंड !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, पोलिस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांनी ही कामगिरी केली.

प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल

समाजात प्रभाव पाडण्यासाठी बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. काही जण पिस्तूल, कोयत्याचे चित्र समाज माध्यमात वापरून दहशत निर्माण करतात. पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका शाळकरी मुलाला वर्षभरापूर्वी कात्रज तलाव परिसरातून अटक करण्यात आली होती.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply