Pune Crime : पुण्याच्या उद्योजकाला ४ कोटींना फसवणाऱ्या 'गुढिया'चं गूढ उकललं, १० महिन्यांपासून होती गायब

Pune : पुण्यातील उद्योजकाला ४ कोटींचा गंडा घालणारी गुढियाला अटक करण्यात यश आले आहे. गेल्या १० महिन्यांपासून ती गायब होती. अखेर बिहारमधून तिला अटक करण्यात आली. पुणे सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या गुढियाला बिहारमधून पुण्यात आणण्यात आले आहे. सानिया सिद्दीकी उर्फ गुढीया असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांच्या तावडीतून ती फरार झाली होती. याप्रकरणी ६ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते.

सायबर पोलिस विभागाच्या पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील नामांकित बिल्डरचा नंबर वापरत, स्वतः बिल्डर बोलतोय असे भासवत 'मी परदेशात आहे, काही पैसे पाठव' असे संबंधित कंपनीच्या अकाउंटंला सांगितले होते. अकाउंटंट यांनी विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाऊंटवर ४ कोटी रुपये पाठवले होते.

 

Mumbai Boat Accident: पासपोर्टच्या कामासाठी आले अन् अनर्थ घडला, बोट दुर्घटनेत गोव्यातील महिलेसह ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

या सायबर क्राईमप्रकरणी पुणे पोलिसांनी सानिया सिद्दीकी उर्फ गुढीयाला अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते. मात्र पुण्यात येत असताना तिने पळ काढला. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या १० महिन्यांपासून पोलिस या गुढियाचा शोध घेत होते. अखेर तिला अटक करण्यात यश आले.

गुढीयाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे सायबर पथक दिल्लीत गेले. त्या ठिकाणी त्यांना ती बिहारमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने थेट बिहार गाठलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल २ दिवस पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला आणि गोपालगंज या गावातून गुढीयाला अटक केली. तिला आता पुण्यात आणण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply