Pune : शाळेत झालेल्या वादातून वर्गात विद्यार्थ्यांचा गळा चिरला- नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद

Pune : वार्षिक समारंभावरुन झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरीतील एका शाळेत नववीत तक्रारदार मुलगा शिकायला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला मुलगा त्याच्या वर्गात आहे. शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Mumbai : वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; कोणी व्हिलचेअरवरून, तर कोणी वॉकर घेऊन मतदान केंद्रात दाखल

वार्षिक समारंभाच्या आयोजनावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील मुलगा पाठीमागून आला. त्याने काचेच्या तुकड्याने त्याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत तो जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर वर्गात मुले घाबरली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply