
Pune : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत असलेले भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांची भेट घेऊन त्यांना आमदारकीचा शब्द दिला. त्यामुळे मुळीक नाराजी दूर ठेवून महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचाराला लागले आहेत.
पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. महायुतीतील जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला आला. या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार असल्याने तेच विधानसभा निवडणूक लढविणार, हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्याला विरोध केला. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी मुळीक विशेष प्रयत्नशील होते.
या मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी भाजपने आमदार पंकजा मुंडे यांच्यावर दिली होती. मुंडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत या भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, ‘मुळीक उमेदवार नसतील, तर महायुतीचे काम करणार नाही,’ असा थेट इशाराच दिला होता. उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत टिंगरे आणि मुळीक दोघांकडेही पक्षाने दिलेले ‘एबी’ फॉर्म होते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुळीक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले होते.
|
Pimpri : भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप |
अर्ज भरण्यासाठी शेवटची काही मिनिटे बाकी असताना फडणवीस यांनी त्यांना फोन करून अर्ज दाखल न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल न करता मुळीक घरी परतले. त्यांचे कार्यकर्ते आणि वडगाव शेरीमधील भाजप पदाधिकारी यावर नाराज होते. मुळीक यांना उमेदवारी न दिल्याने टिंगरे यांचा प्रचार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
दरम्यान, दिवाळीच्या काळात फडणवीस यांनी पुण्यात येऊन सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मुळीक यांच्या घरी जाऊनदेखील फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन नाराजी दूर केली. ‘पक्षाच्या वतीने तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल,’ असा शब्द फडणवीस यांनी मुळीक यांना दिला. हा ‘शब्द’ मिळाल्याने मुळीक यांची नाराजी दूर झाली.
नाराजी दूर; प्रचारात सहभाग वडगाव शेरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. ‘वडगाव शेरीला टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून, या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ,’ असा विश्वास मुळीक यांनी या वेळी व्यक्त केला.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

