
Pune : दीपावलीचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी हवेचे तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असून फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
शहरातील विविध भागांमध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात. फटाक्यांची आतषबाजी केल्याने वायुप्रदूषण होते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून आलेले आहे. हे प्रकार टाळून सुरक्षितपणे दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन हा उत्सव साजरा करावा, असे पालिकेने म्हटले आहे.
आनंदाच्या या उत्सवात विनाकारण उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण हे नागरिकांसह इतर प्राण्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.
|
Pune : दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष |
दिवाळीच्या काळात वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे विविध श्वसनाचे आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेक फटाक्यांचा आवाज अत्यंत मोठा असल्याने बहिरेपणा सारख्या समस्यांना देखील नागरिकांना तोंड द्यावे लागते. काही उत्साही नागरिकांच्या आणि तरुणाईच्या चुकीमुळे अनेकांना सणासुदीच्या काळात रुग्णालयाची पायरी चढावी लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असते. सण, उत्सव आनंददायी वातावरणात साजरा करण्यासाठी राज्य सरकारने आता काही निर्बंध देखील लादले आहेत.
नागरिकांसाठी सूचना
– शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळावा
– धूर करणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळावा
– मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांचा वापर करू नये
– शांतता क्षेत्र म्हणजे शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये आदी ठिकाणी फटाके उडवू नयेत.
– घर तसेच कार्यालय सजविण्यासाठी एलईडी दिवे किंवा सौरदिवे यांचा वापर करावा.
– प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरून सजावट करावी.
‘ एमपीसीबी ‘ कडून लक्ष दिवाळीच्या काळात शहरात ध्वनी प्रदूषण तसेच हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) घेण्यात येणार आहेत. फटाक्यांबाबत वेगवेगळ्या माध्यमातून केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये फटाके वाजवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके उडविले जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या कोणत्या दिवशी सर्वाधिक फटाके वाजविले गेले याचा अभ्यास करण्यासाठी विविध भागात ११ स्टेशनवरून मोजणी केली जाणार आहे. कोणत्या वेळी सर्वाधिक आवाज नोंदविला गेला यातून माहिती देखील यामधून येणार आहे, अशी माहिती एमपीसीबी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

