Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी

Pune  : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर ,शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली.

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले मंजुरी पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी दाखल केले. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, ससूनमधील डॉक्टरांसह सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती करून सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pune : तोतया डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल दाम्पत्याने ससूनमधील डॉ. तावरे, हाळनोर यांना पैसे दिले. मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केले. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी यांच्यासह ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आरोप निश्चितीनंतर सुनावणी

डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगीमिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी  फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली. आरोप निश्चित झाल्यावर सुनावणी सुरू होणार आहे, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply