Pune : नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाल

Pune : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपाकडून पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत कोथरूड येथून चंद्रकांत पाटील, शिवाजी नगरमधून सिद्धार्थ शिरोळे आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ या तीनही विद्यमान आमदारांना भाजप नेतृत्वाने पुन्हा संधी दिली आहे. मात्र या महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापपर्यंत यादी जाहीर करण्यात आली नसून केव्हा उमेदवार जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर महायुतीमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महायुतीमध्ये इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज सायंकाळपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra : अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

या सर्व घडामोडीदरम्यान पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे हे आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बाजूला याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच महायुतीमधील नेत्यासमोर निर्माण झाला आहे. त्याच दरम्यान काल सायंकाळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली.

या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले. आता त्यानंतर हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडावा आणि या जागेवरून नाना भानगिरे यांना उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिक पायी चालत निघाले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply