Pune : बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune  : बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या सामुहिक अत्याचार प्रकरणातील तिघांपैकी एका अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींचा अद्याप शोध सुरू असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. दोन आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी भाषणा दरम्यान बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अटक केल्याची माहिती दिली आहे. मागील सात दिवसांपासून आरोपींचा शोध सुरू होता. अखेर एकाला दारुच्या अड्ड्यावरुन ताब्यात घेतलं. तरुणीने आरोपीला ओळखलं असल्याची माहिती आहे.

काय घडलं होतं?

४ ऑक्टोबर रोजी २१ वर्षीय तरुणीवर बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. रात्री ११च्या सुमारास तरुणी तिच्या मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे तीन तरुण आले. त्या तिघांनी तरुणीसोबतच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्याच बेल्टने आणि शर्टने त्याला झाडाला बांधून ठेवलं होतं. त्यानंतर तरुणीवर तिघांनी अत्याचार केले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

Pune : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून, आईसह प्रियकर अटकेत



त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. तरुणीसोबतच्या तरुणाने लगेच त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. तरुणी जखमी अवस्थेत होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संशयितांचे स्केच शेअर केलेले

त्यानंतर पोलिसांत याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात तरुणीचं स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर आरोपींचं शोध सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील संशियताचे स्केच काढले होते. कोंढवा पोलीस स्टेशन गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच यामध्ये साम्य आढळून आलं होतं. पोलिसांनी स्केच काढल्यानंतर याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं होतं. यासाठी काही नंबरदेखील पोलिसांनी शेअर केले होते.

अखेर या अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असून अद्याप इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच ते दोन्ही आरोपीदेखील ताब्यात घेतले जातील असंही पोलिसांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply