Pune : PM मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! पुणे मेट्रोसह 'या' १२ प्रकल्पांचे होणार लोकार्पण, कसा असेल दौरा?

Pune : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो सेवेचे उद्घाटन आज, गुरुवारी (२६ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी सोलापूर विमानतळ, सी-डॅकने तयार केलेले तीन सुपरकम्प्युटर, बिडकीन इंडस्ट्रियल प्रकल्प, स्वारगेट-कात्रज भुयारी मार्गाचे भूमिपूजन अशा १२ प्रकल्पांचे उद्घाटन-भूमिपूजन केले जाणार आहे.

पंतप्रधान जिल्हा न्यायालय येथील इंटरचेंज मेट्रो स्थानकात सायंकाळी सहाच्या सुमारास येतील. जिल्हा न्यायालय येथून स्वारगेटला जाणाऱ्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून मेट्रोसेवेचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी हे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा मेट्रोतून प्रवास करणार आहेत. त्यानंतर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सर्व प्रकल्पाच्या लोकार्पणच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यातील वेगवेगळ्या प्रकल्पाचे पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

Modi Pune Tour Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोठा निर्णय

पहिला टप्पा पूर्ण होणार
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ३३.२८ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार करण्याचे नियोजन होते. त्यापैकी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा ३.६२ किलोमीटर भुयारी मार्ग गुरुवारी प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या मार्गावरील सर्व स्टेशन सुरू होणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मंजूर झालेले मेट्रो मार्गाचा टप्पा पूर्ण होणार आहे. खडकी आणि रेंजहिल्स अशी दोन स्थानके लवकरच सुरू केली जातील, असे हर्डीकर यांनी सांगितले.

सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ६५ कोटी रुपये खर्च करून नवीन विमानतळ उभारण्यात आले आहे. या विमानतळाची टर्मिनल इमारत ११५२ चौरस मीटर असून, या विमानतळाची वार्षिक क्षमता चार लाख आहे. या विमानतळासाठी १०० कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विमानतळामुळे परिसरातील विकासाला चालना मिळेल, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

इतर प्रकल्प
- भिडे वाडा स्मारक भूमिपूजन
- स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन
- पेट्रोलियम मंत्रालयाची ८६७१ कोटी रुपयांची कामे
- सी-डॅकने तयार केलेल्या तीन सुपर कम्प्युटरचे उद्घाटन
- भूविज्ञान मंत्रालयाच्या हायपरफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) प्रणालीचे उद्घाटन
- छत्रपती संभाजीनगरजवळील सात हजार ८५५ एकरावरील बिडकीन इंडस्ट्रियल प्रकल्पाचे उद्घाटन

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply