Pune : सोसायटीतील गणेशोत्सवात महिलांचा विनयभंग, लोणीकंद पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

Pune : सोसायटीतील गणेशोत्सव रहिवासी महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हर्ष कपूर (रा. कोणार्क एक्झोटिका, वाघोली-केसनंद रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या मंगळवारी (१७ सप्टेंबर) सोसायटीतील रहिवाशांनी विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जन मिरवणुकीत महिला ढोल वाजवित होती. त्यावेळी कपूरने महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेने सोसायटीतील रहिवासी महिलेला सांगितली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सोसायटीतील रहिवासी अरविंद गुलाटी यांना ढोल वाजविणारी महिला आणि आरोपी कपूर यांच्या मध्ये थांबण्यास सांगितले.

Pimpri : आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर; २५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे

मिरवणूक संपल्यानंतर महिला आणि मैत्रीणी गप्पा मारत थांबल्या. महिलेने मैत्रिणींना मिरवणुकीतील कपूरने केलेल्या गैरवर्तनाची माहिती दिली. तेव्हा सोसायटीत गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोच्या वेळी कपूरने आमच्याकडे पाहून शेरेबाजी केली, असे मैत्रिणींनी सांगितले. कपूरने जाणीवपूर्वक सोसायटीतील महिलांशी अश्लील वर्तन केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply