
Pune : अखेर राष्ट्रीय हरित लवादाने नदी सुधार प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पुणे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीचे स्वरूप एकदम पालटणार असून, शहरातील नागरिक त्यामुळे नक्की हर्षभरित होणार, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे आता दुर्गंधीयुक्त नदीच्या सांडपाण्यातून नौकानयनाची अपूर्व संधी पुणेकरांना मिळणार आहे. तिचा लाभ घेता यावा, यासाठी पुणेकरांना खूप आधीपासून नोंदणी करावी लागण्याची शक्यता आहे! नदीच्या पात्रात भिंत उभी करून तिचे पात्र चाळीस टक्क्यांनी कमी केल्यामुळे छोट्या पात्रात सतत पाणी राहील आणि त्यामुळे या नौकानयनाचे मनोहारी दृश्य अनुभवायला मिळणार असल्याचे या प्रकल्पाच्या मसुद्यात म्हटले आहे. त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे नदीच्या पूररेषेत आलेली सुमारे १८०० एकर जमीन पूररेषेबाहेर येणार असून, ती अन्य कारणांसाठी उपयोगात आणता येणार आहे. हे सारे किती रंजक आणि देखणे आहे!
यंदाच्या पावसाळ्यात ३०-३५ हजार क्युसेक वेगाने धरणातील पाणी मुठा नदीत सोडण्यात आले, तेव्हा जो काही हाहाकार उडाला, त्याच्या आठवणी ताज्याच असतील. पण १९९५-९६ मध्ये याच नदीपात्रातून सुमारे ८५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते, तेव्हा ते पुणे महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर उतरले होते. गेल्या तीन दशकांत नदीपात्राच्या परिसरात झालेल्या भव्यदिव्य बांधकामांमुळे यदाकदाचित पुन्हा ८५ हजार क्युसेक पाणी सोडायची वेळ आलीच, तर नदीपात्रातील बोटी कामाला येणार नाहीत. तेव्हा पात्रातील पाणी पात्र सोडून परिसरातील इमारतींच्या पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेले असेल. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला पोहोचण्यासाठी बोटीतून प्रवास करताना नगरसेवकांचे डोळे कसे भरून येतील! तेव्हा नदी सुधार प्रकल्पामुळे झालेल्या सौंदर्य विकासाचे रूप साऱ्या पुणेकरांना डोळे भरून पाहता येणार आहे.
|
|
आत्ता नदीपात्रात केवळ सांडपाण्याचे ओहोळ आहेत. नदीसुधार प्रकल्पामध्ये नदीपात्रात स्वच्छ केलेले सांडपाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रकल्पकर्त्यांचे म्हणणे आहे. असे सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी जे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभे करावे लागतील, त्याचा अजून पत्ताच दिसत नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी २०१८ मध्ये एका सर्वसाधारण सभेत असे जाहीर आश्वासन दिले होते, की येत्या सहा वर्षात हे शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होतील आणि नदीपात्रात केवळ शुद्ध पाणीच प्रवाही राहील. आता सहा वर्षे उलटून गेली. दरम्यानच्या काळात आयुक्तही बदलून गेले. सांडपाणी प्रकल्पाचे पुढे काय झाले, हे कुणालाच ठावे नाही. उलट या काळात अस्तित्वात असलेले शुद्धीकरण प्रकल्प बंद करून त्या जागा कुणा बिल्डरला आंदण म्हणून देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची कुजबूज सुरू झाली. त्यामुळे नदीसुधार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डासांच्या संगतीत राहण्याची मनाची तयारी करणे अधिक योग्य! नदीच्या परिसरातील जैवविविधतेमध्ये डासांचे अस्तित्व असतेच की!
समजा भविष्यात ढगफुटी झालीच, तर काय करायचे, हे त्या वेळचे नगरसेवक आणि प्रशासन पाहून घेईल. त्याची आत्तापासूनच काळजी करण्याचे काही कारण नाही. आत्ता नदीपात्राच्या सुशोभित परिसराचे नयनरम्य चित्र डोळ्यात साठवणे अधिक महत्त्वाचे. नदीपात्रात उंच भिंत बांधल्यामुळे कदाचित ती ओढ्यासारखी भासेलही. पण जागोजागी हीच ती मुठा नदी, असे फलक लावले, की पुणेकरांच्या ते नक्की लक्षात येईल. त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला का, याची सतत चौकशी करणाऱ्या पुणेकरांना छत्रपती संभाजी महाराज आणि नवा पूल पाण्याखाली गेला का, याची चौकशी करावी लागेल, एवढेच! महापालिकेची निवडणूक कधीतरी होईलच. त्या वेळी निवडून येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आत्तापासूनच दिवसाची १८०० एकर जमिनीच्या वापराची चिंता लागून राहिली आहे. तसे पुणेकर सहनशील आणि शांत आहेत. तेव्हा त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नदी पात्राचे देखणे रुपडे हेच तर खरे समाधान!!
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


