
Pune - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. या अर्जाची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे सादर करावी लागत होती.
या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि कागदविरहित केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत.
विद्यापीठाने कागदविरहित प्रक्रियेकडे पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता ऑनलाइन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळणार आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन पोर्टलचे उदघाटन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. विद्यापीठातील विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात.
|
Mumbai Rain : ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या |
मात्र प्रवेश घेताना, तसेच पारपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना ट्राक्सक्रिप्ट प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्रे अनिवार्य असतात. त्यात ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र, रैंक प्रमाणपत्र, मीडियम प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, दुय्यम शैक्षणिक प्रमाणपत्र याचा समावेश आहे.
आतापर्यंत ही कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे सादर करावी लागत होती. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाइन आणि कागदविरहित पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या ही प्रमाणपत्रे मिळतील. विशेष म्हणजे या प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यातील अपडेट मेसेज आणि ई-मेलद्वारे मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जाचा टप्पा तपासता येणार आहे. विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनने निर्माण केलेल्या या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

