Pune : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना

Pune : पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची पाहण्यास गर्दी झाली होती. तर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला असता ते म्हणाले की, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट या इमारतीच्या परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ड्रेनेज लाईन साफसफाई करण्यासाठी महापालिकेचा ट्रक आला होता. त्यावेळी ट्रक उभा असलेल्या जागेचा भाग खचून ट्रक पूर्णपणे खड्ड्यात गेल्याची घटना घडली.

Pune : पुण्यात रस्त्याला भगदाड, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात, सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील घटना

त्यानंतर दोन क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले आहे. पण त्यानंतर खड्डा पडलेल्या भागाची पाहणी केल्यावर विहिरीच्या खुणा दिसत आहे. काही वर्षांपूर्वी त्या जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. आज त्याच जागेवर ट्रक थांबविण्यात आला होता आणि त्या ट्रकचे वजन अधिक असल्याने पेव्हर ब्लॉक खचले. त्यामुळे क्षणात ट्रक पूर्णपणे खड्ड्यामध्ये गेल्याची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply