Pune : शाळांतील मुख्याध्यापक पदासाठी किती विद्यार्थी अनिवार्य? शिक्षण विभागाकडून नियमात बदल…

Pune  : राज्यातील पहिली ते पाचवी, पहिली ते दहावी, आठवी ते दहावी, आठवी ते बारावीच्या शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पदनिश्चितीच्या प्रचलित धोरणामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्याबाबतचा निर्णय १५ मार्च २०२४ रोजी घेतला होता. त्यात मुख्याध्यापक पदासाठी १५० विद्यार्थिसंख्या निश्चित करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला राज्यभरातून विरोध करण्यात आला. त्यानंतर त्यात आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे आवश्यक, तर पूर्वीच्या मंजूर पदांस संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थिसंख्या ९० असणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Pune : शिक्षक आक्रमक, व्हॉट्सॲप समुहांतून बाहेर



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply