Pune : असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा

Pune  : पिंपरी- चिंचवड शहरामध्ये गणपती बाप्पांसाठी एक अनोखा देखावा साकारण्यात आला आहे. पंधरा फूट उंच बॅट आणि भल्या मोठ्या चेंडूमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गेल्या वर्षीदेखील आनंद हेंद्रे यांनी अशाच प्रकारे अनोखा देखावा करत चंद्रयानची प्रतिकृती बनवली होती. त्याच देखील कौतुक झालं होतं.

पिंपरी- चिंचवडसह देशभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध प्रश्न आणि जनजागृती पर देखावे गणपती बाप्पांच्या माध्यमातून सादर केले जात आहे. असाच एक देखावा भोसरी एमआयडीसीमध्ये कार्यरत असणाऱ्या आनंद हेंद्रे यांनी सादर केला आहे. आनंद हेंद्रे यांच्या कंपनीमध्ये पंधरा फूट उंच बॅट आणि चेंडूत गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यावर वर्ल्डकप ची ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते.

नुकताच टी- ट्वेंटी वर्ल्ड कप झाला. हा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला. याचा आनंद म्हणून गणपती बाप्पाचा देखावा देखील क्रिकेटच्या साहित्यावर बनवण्यात आल्याचे हेंद्रे यांनी सांगितलं. पंधरा फूट उंच बॅट, भला मोठा चेंडू आणि वर्ल्ड कप ची ट्रॉफी हे सर्व अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये थर्माकोल पासून बनवण्यात आल आहे. याच कौतुक होत असून सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply