Pune : पुणे ते कोल्हापूर धावणार 'वंदे भारत ट्रेन'; आठवड्यातून ३ दिवस सुविधा, थांबे कोणते? वाचा वेळापत्रक

Pune  : हुबळी-पुणे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ तीन दिवस पुणे ते कोल्हापूर दरम्यान चालणार आहे. तर, तीन दिवस हुबळी ते पुणे मार्गावर चालणार आहे. तर, दर मंगळवारी ही गाडी बंद असेल. १५ सप्टेंबरपासून ही ‘वंदे भारत’ धावणार असून, त्याची चाचणी आज, १४ सप्टेंबर होणार आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हुबळी ते पुणे दरम्यान बुधवार, शुक्रवार आणि रविवार दरम्यान ही एक्स्प्रेस धावेल. ही एक्स्प्रेस पुणे ते हुबळी दरम्यान गुरुवार, शनिवार आणि सोमवार धावणार आहे. हुबळीहून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल. ती पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचेल. तर, त्या वेळी ही गाडी पुण्यातून दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सुटेल. ती हुबळी येथे रात्री दहा वाजून ४५ मिनिटांनी दाखल होईल.

Sangli : ४४ वर्षांपूर्वी एक घटना घडली, अन् गोटखिंडीत हिंदू-मुस्लीम बांधव एकवटले, मशिदीत गणपती बसवण्याची अव्याहत परंपरा

पुणे ते कोल्हापूर दरम्यान बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही ट्रेन धावणार आहे. पुण्यातून ती दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सुटेल. ती कोल्हापूर येथे रात्री सात वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. तर, कोल्हापूर ते पुणे दरम्यान गुरुवार, शनिवार आणि सोमवार अशी धावणार आहे. कोल्हापूर येथून ही ट्रेन सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. ती पुण्यात दीड वाजता दाखल होईल.

असे असतील थांबे
पुणे-कोल्हापूर मार्गावरील थांबे : सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, कोल्हापूर

पुणे-हुबळी मार्गावरील थांबे : सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, हुबळी

‘रेल्वे मार्गापासून दूर रहा’वंदे भारत ट्रेनची चाचणी कोल्हापूर ते पुणे मार्गावर शनिवारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी सकळी ११ वाजता ‘वंदे भारत एक्सप्रेस’ कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटेल. ही ट्रेन हायस्पिड असल्यामुळे, नागरिकांनी पुणे विभागातील कोल्हापूर आणि पुणे दरम्यानच्या रेल्वेमार्गापासून दूर राहावे व अनधिकृतपणे रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply