Maval : लेकरु डोळ्यासमोर बुडतंय म्हणून बाप मदतीला धावला, अन् दोघांनी आपला जीव गमावला

Pune  : सध्या गणपतीचा उत्सव सर्वत्र मोठया धूम धडाक्यात सुरू आहे. अशातच आज काही घरगुती गणपतीचे विसर्जन देखील करण्यात आले आहे. मात्र या घरगुती विसर्जनाला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना वडिल आणि मुलगा एकत्र पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दोघांचाही मृत्यू झाला असून वडिलांचा मृतदेह सापडला आहे. तर मुलाचा मृतदेह सोडण्याचे काम सुरू आहे. या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

नेमकं काय घडलं?

संजय धोंडू शिर्के ( वय 45). आणि हर्षल संजय शिर्के ( वय 20) असे बुडून मृत्यू झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. आज गुरुवारी सहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील कडधे परिसरात हा प्रकार घडला आहे. याबाबत मिळालेली माहिती नुसार, आज काही घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू होते. त्यातच मावळ तालुक्यातील कडे येथील संजय शिर्के आणि हर्षल शिर्के हे घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. घराच्या जवळ असलेल्या उत्खनन केलेल्या साचलेल्या पाण्यात हे गणपती विसर्जनासाठी गेले होते.

Pune : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने मित्रालाच संपवलं; पोलिसांनी १२ तासांत चक्रं फिरवली आणि...

विसर्जनावेळी आपला मुलगा हर्षल बुडत असल्याचे वडिलांना दिसले. त्यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा यांच्या मदतीने बुडालेल्या दोघांपैकी संजय शेळके यांचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले आहे. मात्र मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे मावळ तालुक्यामध्ये गणपती विसर्जन करताना काळजीपूर्वक करावे. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलिसांकडून केला जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात चिमूकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात देखील अशीच घटना घडली आहे. नदीच्या पुलाजवळ खेळत असताना एका सात वर्षाच्या मुलाचा नदीत पडून मृत्यू झाला आहे. खामगाव तालुक्यातील कोरेगाव गावात ही घटना घडली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply