Pune  : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने मित्रालाच संपवलं; पोलिसांनी १२ तासांत चक्रं फिरवली आणि...

Pune  : पुण्यातील वाकड परिसरातून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राने मैत्रीमध्ये विश्वाघात केल्याने एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं. आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय असल्याने सोबत काम करणाऱ्या पेंटर मित्राला सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पती पसार झाला होता. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीच्या गावी जाऊन त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ ही घटना घडली होती.

अली अन्सारी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकणी वाकड पोलिसांनी आरोपी बाळू विठ्ठल साळवे (३२, रा. श्रीनगर कॉलनी, रहाटणी. मूळ रा. केसापुरी, माजलगाव, बीड) याला १२ तासांत अटक केली आहे.

Pune : पुणेकरांनो, यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात! ढोलताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ अंदाजे ३५ वर्षे वयाचा पुरुष बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरात चौकशी करून अली अन्सारी अशी मृत व्यक्तीची ओळख पटवली. तसंच तो पेंटर असल्याचंही पोलिसांना समजलं.

दरम्यान, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या. दोन्ही टीमने अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. प्रत्यक्ष साक्षीदार, घटनास्थळ आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे अली अन्सारी याच्या सोबत काम करणारा बाळू साळवे (रा. रहाटणी फाटा) याने ही हत्या केल्याचं समोर आलं.

त्यानुसार, पोलिसांनी रहाटणी परिसर पिंजून काढत आरोपीचं घर शोधून काढलं. आरोपीच्या पत्नीकडे पोलिसांनी विचारपूस केली असता तिने आपला पती घरी आलाच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू साळवे हा मूळ गावी गेल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर एका पथकाने थेट बीड गाठलं. आता मूळ गावातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *