Pune : बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट

Pune : विधानसभेत चांगले संख्याबळ प्राप्त करण्यासाठी भिस्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीतील गोविंदबाग या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या गर्दीने हे संकेत दिले आहेत. लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याची जोरदार तयारी पवार यांनी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *