Pune : तुतारी घेऊन कोण? पठारे की टिंगरे? वडगाव शेरी मतदारसंघाविषयी तर्कवितर्कांना उधाण

Pune  : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी आमदार बापू पठारे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकण्याचे जाहीर संकेत दिले आहेत. त्याचवेळी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याच मतदारसंघातून तुतारी वाजविण्यास इच्छूक असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या निवासस्थानी दिलेली भेट ही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून पठारे की टिंगरे यापैकी कोण तुतारी वाजविणार, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच या मतदारसंघात यापूर्वी निवडून गेले होते. त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे हे २०१७च्या महापालिका निवडणुकीदरम्यान ‘भाजप’वासी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा युतीत प्रवेश झाल्यामुळे पठारे; तसेच टिंगरे यांचा भाजपकडून विधानसभा लढण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आहे. वडगाव शेरीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे. त्याचवेळी या दोघांच्याही घरी जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट वातावरण तयार केल्याने तुतारी कोण वाजविणार, यावर वडगाव शेरीत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Pune News: बनावट तिकीटानंतर जागेवरुन हाणामारी, प्रवाशाने विमानात सिगरेट ओढली; दिल्ली-पुणे विमानात काय घडलं?

पठारे आणि टिंगरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी अद्यापपर्यंत दोघांनाही ठोस आश्वासन मिळाले नसल्याची चर्चा आहे. पक्षात प्रवेश करा, त्यानंतर निर्णय घेऊ, असा सल्ला पवार यांच्याकडून देण्यात आल्याने दोघांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी दोघांशीही स्वतंत्र चर्चा केली आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वडगाव शेरी मतदारसंघ मिळावा, यासाठी आग्रह धरला आहे. जागा वाटपामध्ये वडगाव शेरीच्या जागेवर निर्णय झाल्यानंतरच वडगाव शेरीचा उमेदवाराचा निर्णय होईल, असे पवार यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी वडगाव शेरीत तुतारी कोण वाजवणार, यावर चर्चा झडतील, असे चित्र सध्या दिसते आहे. दरम्यान, पठारे, टिंगरे यांच्याशिवाय सुनील खांदवे, रमेश आढाव आणि भीमराव गलांडे ही उमेदवारासाठी इच्छुक आहेत.

मुळीकांकडून मंडळांच्या भेटीगाठी
विधानसभेसाठी इच्छुक असणारे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी गणेशोत्सवात मंडळांच्या भेटीगाठी वर भर दिला आहे. वडगाव शेरी मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत आमदार पंकजा मुंडे मार्गदर्शन करताना मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप यांनी विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्यास काम करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यातील शीतयुद्ध आणखी रंगणार असल्याची शक्यता आहे.

 



हे पण वाचा-
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर तसं झालं नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल,””; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply