Pune : बिबवेवाडीत मेफेड्रोन विक्री करणारे दोघे गजाआड

Pune  : मेफेड्रोन विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुबेर उर्फ सुलतान लतीफ खान (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा, मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश ), स्वप्निल बापू शिंदे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा, मूळ रा. वेल्हे, ता. राजगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बिबवेवाडीतील गंगाधाम रस्त्यावर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी खान आणि शिंदे मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणारे सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक अशोक येवले यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान आणि शिंदे यांना पकडले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Pune : बनावट दूरध्वनी केंद्रासाठी सात हजार सीमकार्डचा पुरवठा; ‘एटीएस’कडून आणखी दोघांना अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकुंभ, येवले, संजय गायकवाड, संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमीत ताकपेरे यांनी ही कारवाई केली.

शहरातील अमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात छापा टाकून एकाकडून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल नुकतेच जप्त केले होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply