Pune Crime : जादूटोण्यावरून ज्येष्ठाच्या खुनाचा प्रयत्न; दोन लाखांची सुपारी, सहकार पोलिसांकडून तिघांना अटक

Pune: ज्येष्ठ नागरिकावर शस्त्राने वार करण्याच्या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संबंधित ज्येष्ठ नागरिक जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोन लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघेही रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर शशिकांत सोनार (वय ३२, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर सोनू पांडू होडे (वय ६७, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. होडे यांच्यावर १५ जून रोजी पद्मावती परिसरात तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते.

Police Bharti 2024 : पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल, अकोल्यात १००० उमेदवारांची शारीरिक चाचणी रद्द

या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. सहकारनगर पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून याबाबत तपास सुरू होता. दरम्यान, होडे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार हा सुपर इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती सहकारनगर तपास पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कुंभारला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी सागर सोनार याच्या सांगण्यावरून होडे यांच्यावर हल्ला केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply