Pune-Miraj Train Route: पुणे-मिरज रेल्वे मार्ग तयार, क्षमता मोठी मात्र गाड्यांची वानवा; खडतर प्रवास कायम

Pune  : पुणे-मिरज दरम्यान २८० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, सध्या तरी या मार्गावरून दिवसाला फक्त सहा एक्स्प्रेस व तीन लोकल धावतात. त्यामुळे हजारो कोटींचा खर्च करून तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे सद्यस्थिती?

मध्य रेल्वेने पुणे-मिरज या २७९ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सन २०१६ मध्ये सुरू केले. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पासाठी चार हजार ८८२ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे कामाला वेळ लागत होता. करोना काळातही काही दिवस काम बंद असल्याचा फटका या कामाला बसला आहे. सध्या तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यांतील १८ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. उर्वरित ६३ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१७ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Pune : बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !

किती येणार खर्च?

मध्य रेल्वेने पुणे मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी चार हजार ८०० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे ते मिरज दरम्यानचा मार्ग तयार होत आला आहे. मात्र, या मार्गावर गाड्यांची संख्याच खूपच कमी आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च करूनदेखील प्रवाशांना त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. सध्या या मार्गावर कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस व चार लोकल गाड्या धावतात; पण मार्गाची क्षमता मोठी असल्यामुळे तातडीने या मार्गावर गाड्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.

पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर खूपच कमी गाड्या धावतात. या मार्गावरून दिवसाला १०० पेक्षा जास्त गाड्या धावण्याची क्षमता आहे. यामार्गे उत्तर भारतातदेखील गाड्या जाऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता मार्ग केला आहे. तातडीने गाड्या वाढवाव्यात. मालवाहतुकीसाठी देखील या भागातील रेल्वे स्थानकाचा विकास करावा.

काय सांगते आकडेवारी?

  • पुणे-मिरज मार्गावरून दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस व लोकल - ९
  • पुणे-मिरज मार्गावरून आठवड्यातून एकदा धावणाऱ्या एक्स्प्रेस - ११
  • पुणे-मिरज मार्गावर आठवड्यातून दोन व तीन वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस - २६
  • पुणे-मिरज मार्गावरून एकूण धावणाऱ्या एक्स्प्रेस व लोकल - २७

 

दुहेरीकरणाचे काम किती?

  • पुणे-मिरज रेल्वेमार्गाची एकूण लांबी : २७९.०५ किलोमीटर
  • दुहेरीकरण पूर्ण : २१७ किलोमीटर (८७ टक्के)
  • प्रकल्पाची एकूण किंमत : ४८८२.५३ कोटी
  • आजपर्यंतचा खर्च : अंदाजे चार हजार कोटी
  • आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची प्रगती : ८७ टक्के


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply