Pune Gas Explosion: पुण्यात अग्नितांडव, भल्यापहाटे गॅस गळतीने स्फोट, पाचजण जखमी

Pune : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी जेवण बावण्यासाठी गॅस चालू केला असता अचानक गॅसाचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बुद्धनगर भागात हा प्रकार घडला आहे. यात स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. गॅस स्फोटमधील जखमी मनोज कुमार (वय १९), धीरज कुमार( वय २३), गोविंद राम (वय २८), राम चेलाराम (वय ४०), सत्येंदर राम (वय ३०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, किवळे येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीत असलेल्या दुकानांना आग लागल्याची माहिती रितेश खांडेलवाल यांनी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशामक मुख्यालयातून तीन, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रातून एक, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राचा एक आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या दुकानांचे शटर कुलूपबंद होते. त्यामुळे पावर कटर मशीनने शटर कट करण्यात आले. आगीवर होज व होज रील होजच्या साह्याने पाणी मारून आग पूर्णपणे विझविण्यात आली.

Pune : पुणेकरांसाठी Good News! आता एका क्लिकवर निघणार PMPचं तिकीट, ३ दिवसांत ५० हजार प्रवाशांना फायदा, असा आहे अ‍ॅप...


अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संपत गौंड, सारंग मंगरूळकर, संजय महाडिक, रुपेश जाधव, लक्ष्मण बंडगर, अनिल माने, श्रीहरी धुमाळ, साबळे, ट्रेनि फायरमन शिवाजी पवार, गौरव सुरवसे, सिद्धेश दरवेश, किरण राठोड, राज शेडगे, प्रतीक आहीरेकर, राहुल कराडे, अनिल गोसावी, परमेश्वर दराडे, श्रीवर्धन, पाटील, शिंदे, पवार, मोरे, कवडे, चिंता, निकम, लावड, चव्हाण, पाटील, तडवी यांनी घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply