पोर्शे अपघातानंतर धक्कादायक घटना समोर; दोघांना कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला 6 महिन्यांनी अटक

 

Pune : पुणे पोर्शे कार अपघातासारखे आणखी एक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर येथून समोर आले आहे. कार चालवत असताना एका अल्पवयीन मुलाने दोन मुलांना चिरडल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला पुन्हा कार दिली आणि काही महिन्यांतच कारला पुन्हा अपघात झाला. दुसऱ्या अपघातात चार जण जखमी झाले. या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील डॉक्टर असल्याची माहिती आहे. या दोन्ही प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडली होती. एका 15 वर्षीय मुलाने दोन मुलांवर गाडी घातली आणि त्यांना तिथे सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. दोन्ही पीडितांचा जागीच मृत्यू झाला होता. सागर आणि आशिष अशी मृतांची नावे आहेत. अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलासोबत त्याचे तीन मित्रही कारमध्ये होते. याप्रकरणी IPC कलम 304A

या अल्पवयीन मुलाने अपघात केल्याची दुसरी घटना महिनाभरापूर्वी घडली. 31 मार्च रोजी याच अल्पवयीन मुलाच्या कारला झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही.

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण समोर आल्यानंतर आता यूपी पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 22 मे रोजी दोन्ही प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय

अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासही झाला पण कोणतीच कारवाई झाली नाही, असे वृत्त आजतकने दिले आहे.

पुणे पोर्शे अपघात

18 आणि 19 मे च्या मध्यरात्री कल्याणीनगर येथे पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार चालवत होता. मात्र, अटक झाल्यानंतर काही तासांतच त्याला जामीन मिळाला.

या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. प्रकरण वाढल्यावर पोलिसांसह सरकारनेही गंभीर पाऊले उचलली. सर्वप्रथम आरोपी मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आणि आता आरोपी मुलाचा जामीनही रद्द करण्यात आला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत बाल निरीक्षण केंद्रात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत.

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply