Pune : पुण्यात उद्या मविआ आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने येणार! नेमकं कशासाठी?

पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुक अतिशय रंगतदार बनत चालली आहे. उद्या महाविकासआघाडी आणि भाजपाचे उमेदवार आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही आमदार सोमवारी एकाच वेळी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहे. भाजपाने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता.

हे दोन्ही उमेदवार सोमवारी सकाळी ९:३० वाजता आपापल्या पक्षातील नेत्यांसह शक्तीप्रदर्शन करणार आहेत. कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही उमेदवार कसबा विधानसभा पोटनिवडणूकसाठी उमेदारी अर्ज दाखल करतील. यावेळी महाविकासआघाडी आणि भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.

काँग्रेस उद्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सकाळी ९.३० वाजता कसबा गणपती मंदिर येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर. पी. आय. (ए), शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत नारायण रासने हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते देखील कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहे. यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर भरणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply