
इंदापूर : इंदापूर शहरालगत असलेल्या माळवाडी येथे चोरट्यांनी चोरी केलेले 8 लाख 75 हजार रुपये किमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या 4 तासात मुसक्या आवळून दागिने हस्तगत करण्यात इंदापुर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला यश आले असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (ता.04) रोजी अशोक अंकुश व्यवहारे (वय 43 वर्षे, रा.क्षीरसागर वस्ती,माळवाडी ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस स्टेशन येथे त्यांचे घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती.
यानुरूप सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास पाचारण करीत गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे प्रमाणे वेगवेगळया कुल्प्त्या वापरून व तांत्रीक विष्लेशन करून सखोल तपास करीत गुन्हयात दोन आरोपी सागर अरुण राऊत (वय 20 वर्षे, रा.टेंभुर्णी कोष्ठी गल्ली) व दादा बळी शेंडगे (वय 21 वर्षे रा.साठेनगर ता.इंदापुर) यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांचे कडुन सदर गुन्हयातील चोरीला गेलेले 8 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा 4 तासात उघडकीस आणला आहे. आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,
पोलीस हवालदार प्रकाष माने,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,पोलीस नाईक सलमान खान, लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोखंडे ,लक्ष्मण सुर्यवंशी व महीला पोलीस हवालदर शुभांगी खंडागळे यांच्या पथकाने केली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

