Pulwama Attack : 'जैश'च्या 5 दहशतवाद्यांना जन्मठेप; पुलवामात 40 जवान झाले होते शहीद

नवी दिल्ली : सीआरपीएफच्या जवानांवर जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नेटवर्क 18 या वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे

पुलवामातील सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणे आणि कट रचल्याबद्दल कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. या पाच दहशतवाद्यांमध्ये सज्जाद अहमद खान याच्या नावाचाही समावेश आहे. ज्यानं पुलवामाच्या हल्ल्यादरम्यान सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत माहिती दिली होती.

कोर्टानं या पाच दहशतवाद्यांना देशभरात केलेल्या दहशतवादी कारवाया आणि यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सज्जाद खान, बिलाल मीर, मुजफ्फर भट, इशफाक भट आणि मेहराजुद्दीन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी कोर्टानं म्हटलं की, सर्व दोषींनी मिळून भारताविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला. यामध्ये दोषी केवळ जैशचे सदस्य नव्हते तर ते दहशतवाद्यांना हत्यारं पुरवून त्यांना सहकार्य करत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply